आरोग्य कर्मचा-यांच्या पदोन्नतीबाबत येत्या १५ दिवसांत आदेश प्रारित आरोग्य संचालिकांचे आश्वासन

मुंबई (प्रतिनिधी) : आरोग्य कर्मचा-यांच्या पदोन्नतीबाबत येत्या १५ दिवसांत आदेश प्रारित करण्यात येतील, असे आश्वासन आरोग्य सेवा - २ च्या संचालिका डॉ.अर्चना पाटील यांनी दिल्यामुळे राज्य सरकारी आरोग्य कर्मचा-यांमध्ये आनंदांचे वातावरण आहे.याबाबत राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच ऩुकतीच महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेटदेखील घेतली होती. त्यावेळी ही चर्चा झाली.

चर्चेत पुणे जिल्हाध्यक्ष कृष्णा साळवी, पुणे विभागीय उपाध्यक्ष दिनेश कुचेकर, सार्वजनिक आरोग्य विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव  राजन राऊत, उपाध्यक्ष श्री. मुजावर, सह सचिव नसुरुद्दीन शेख, औरंगाबादचे श्री. लांडगे मामा व महासंघाच्या मुख्यालयाचे कार्यालय प्रमुख श्री. दिवेकर आणि इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी भाऊसाहेब पठाण यांनी महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांच्या चर्चेसाठी संचालक महोदयांना महासंघाचे पत्र दिले, त्यावर चार-पाच दिवसांनंतर चर्चेचे आश्वासनदेखील त्यांनी दिले.


संबंधित पोस्ट