जोगेश्वरी येथील अरविंद गंडभीर शाळेच्या 1990 च्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी केली वंचित कुटूंबांना मदत

मुंबई (प्रतिनिधीजोगेश्वरी पूर्व येथील अरविंद गंडभीर शाळेच्या 1990 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जोगेश्वरी व आसपासच्या विभागातील शंभर गोरगरीब व वंचित कुटुंबाना गणेशोत्सवानिमित्त किराणा सामानाच्या किटचे  तांदूळ,डाळ साखर,तेल साबण,मीठ,पोहे,रवा व मास्क मदत वाटप केले ,  ह्या विद्यार्थी आणि समाजातील काही दानशूर व्यक्ती यांना याकामी एकत्र आणण्याचं काम व या कुटुंबाना मदत पोहोचवता यावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी पुढाकार घेतला.यावेळी पश्चिम रेल्वेचे गुणवंत कामगार पुरस्कार विजेते मोटरमन चंद्रशेखर सावंत,सालम जीमचे संस्थापक सूर्यकांत सालम व मुंबई मित्रचे सीईओ अमोल राणे आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनाली आठले,उमेश सांडे अजित वैद्य,सरिता पवार,सचिन भवने चंद्रशेखर सावंत,गजानन पाटील,ज्योती टेमकर,फिलिप रोड्रिक्स सर,मेघा अनवकार नीतू डवंगे,दत्ता रातवडकर,लीना भाटकर नयन नार्वेकर,जगदीश वाडेकर,जनार्दन नाईक,प्रदिप बावस्कर,प्रवीण पवार,प्रमोद पाटील,अनिल गुप्ता,जयश्री रेवाळे, सुभाष पेडणेकर,गणेश धनावडे आदी सर्व विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यानी सहकार्य केले मार्चमध्ये लॉकडाउन सुरू झाले मार्चपासून ते आतापर्यंत गणेश हिरवे यांनी विविधप्रकारे जवळपास एक हजाराहून अधिक गरजूंना किराणा मदत वाटप केले असून यापुढेही वर्षभर अशाप्रकारचे वंचित घटकांना विविध माध्यमातून सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे गणेश हिरवे यांनी सांगितले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट