तुकाराम मुंढे यांना करोनाची लागण

नागपूर (प्रतिनिधी) : नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. नियम आणि अटींप्रमाणे मी स्वत:ला अलगीकरण (आयसोलेट) केलं आहे. माझ्या संपर्कातील सर्वांनी करोना चाचणी करुन घ्यावी, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आपण नक्की जिंकू, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तुकाराम मुंढे यांनी ट्विट करत करोना विषाणूची लागण झाल्याची माहिती दिली. मला करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही नियम आणि अटींप्रमामे मी स्वत:ला अलगीकरण (आयसोलेट) केलं आहे. मागील १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरनाची चाचणी करावी अशी विनंती आहे. तसेच नागपूरमधील करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी घरुन काम करणार आहे. आपण लवकरच ही लढाई जिंकू.

दरम्यान, करोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि या रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये यासाठी नागपूर महानगरपालिका  तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाचं गठन केलं आहे. नागपुरातील खासगी रुग्णालयांवर महानगरपालिकेचा वॉच ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट