
मनसेचं खळखट्याक, वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन जालन्यात वीजवितरणाच्या कार्यालयाची तोडफोड
- by Reporter
- Aug 24, 2020
- 621 views
जालना (प्रतिनिधी) : वीजवितरण जालन्याच्या कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे वाढीव वीज बिल माफ करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी अंबड येथील वीजवितरण कार्यालय मनसेकडून फोडण्यात आले. राज्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वाढीव वीज बिल आल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत
मनसेच्या ७ ते ८ कार्यकर्त्यांनी खुर्च्या टेबल फेकून तोडफोड केली आहे. तसेच खिडकीच्या काचाही फोडल्या आहेत. त्यामुळे वीजवितरण कार्यालयाचे नुकसान झाले आहे. महावितरणकडून अद्याप याविषयींची तक्रार देण्यात आली नाही. मनससेने यापूर्वी महावितरण कार्यालयात वीज बिल माफ करण्यासाठी निवेदन दिले होते.
मनसेचं पुण्यात आंदोलन
लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव विज बिलामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याप्रकरणी १ ऑगस्टला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यातील महावितरणाच्या कार्यालयात खळळखट्याक आंदोलन करत तोडफोड करण्यात आली होती. यावर नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया देत कारवाईचा इशाराही दिला होता. जर मनसेने तोडफोड केली असेल, तर त्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल. कोणत्याही शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं तर कारवाई होते, असे नितीन राऊत म्हणाले होते.
रिपोर्टर