औरंगाबाद मधील घाटी रूग्णालयात निवासी डाँक्टरना विद्यावेतन न मिळाल्याने काम बंद आंदोलन..

औरंगाबाद (भारत कवितके) : औरंगाबाद मध्ये घाटी रूग्णालयातील कार्यरत असलेले निवासी डाँक्टरनी आपले विद्यावेतन खात्यात जमा न झाल्याने कामबंद आंदोलन सुरू केले आहे.सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटामुळे निवासी डाँक्टरना विद्यावेतन मिळण्यास विलंब होत आहे,असे समजून आम्ही आमचे काम करीतच राहिलो.परंतु हा विलंब फारच लागल्याने आम्हला सुध्दा आमच्या आर्थिक

अडचणीला सामोरे जावे लागत आहे.विद्यावेतनाबाबत ऱूग्णालयीन प्रशासनाकडून वारंवारं टाळा टाळ करीत सुसंगत उत्तरे मिळाली नाहीत.फक्त आश्वासन मिळत गेले,आमच्याही अडचणीत वाढ झाल्याने आम्ही नाईलाजास्तव कामबंद करीत आहे,आम्ही आमच्या जीवावर उधार होऊन ,जीवाची पर्वा न करता रूग्णालयीन कामे करीत असतो.असे तेथील आंदोलन करणार्या निवासी डाँक्टरांचे मत आहे.निवासी डाँक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे रूग्णलयीन कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे रूग्णालयीन प्रशासनाने सांगितले.

संबंधित पोस्ट