सुखकर्ता दु:खहर्ता.. लाडक्या बाप्पाचं घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन

मुंबई (प्रतिनिधी) : १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचं घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे. अर्थातच आज शनिवारपासून गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी परंपरागत गणेशोत्सवाचं चित्र काहीसं पालटलेलं आहे. अर्थातच याला कारण ठरत आहे ती म्हणजे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं उदभवलेली आव्हानाची परिस्थिती.

मागील बऱ्याच महिन्यांपासून कोरोनाशी लढणाऱ्या सर्वांनीच आता मोठ्या मनोभावे आपआपल्या घरात, काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये श्रींची प्रतिष्ठातपना केली आहे. तर, काहींनी मनोभावे या गणरायाला साकडं घालत ‘बाप्पा  गजानना हे संकट दूर कर’, अशी विनवणी केली आहे.

संपूर्ण देशात आणि अर्थातच परदेशातही अतिशय मंगलमय अशा या पर्वाची सुरुवात झाली आहे. असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या मुंबईतील प्रभादेवी परिसरात असणाऱ्या श्री सिद्धीविनायक मंदिरात गणेश चतुर्थीच्या निमित्तानं गणरायाची आरती करण्यात आली.

दरम्यान, प्रशासनाकडूनही नियमांचं पालन करत शिस्तबद्दपणे गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उत्सवाचं स्वरुप बदललं असलं तरी नागरिकांच्या मनातील उत्साह मात्र तितकाच आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया ! तुमच्यावर गणेशाची कृपा कायम राहो. सर्वत्र आनंद आणि भरभराट असो”.

आप सभी को गणेश चतुर्थी की बहुत-बहुत बधाई। गणपति बाप्पा मोरया!

संबंधित पोस्ट