
बनावट आयडीचा वापर करनाऱ्यावर दादर रेल्वे पोलिस स्टेशनची प्रभावी कारवाई
- by Reporter
- Aug 21, 2020
- 949 views
दादर (प्रतिनिधी) : आज सकाळी १०.३० वाजता दादर रेल्वे स्टेशन फलाट न ६ वर अत्यावश्यक व सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी चालू असलेल्या लोकल ट्रेनने आलेला एक संशयित इसम नामे- आलिममोहमद बशीर पटेल वय १९ वर्षे रा.डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक रूम नं २ आशाताई चाळ नं २५८ तीन नळ पोलीस चौकीच्या पुढे कुर्ला (प) मुंबई याच्याकडे उपस्थित टीसी व पोलिसांनी विचारना करून त्यांचे आयडी (ओळखपत्र) तपासले असता ते आयडीवर रेल्वे कर्मचारी नमुद होते व खाली BMC मुंबई उल्लेख असल्याने संवशय बळावला त्याबाबत चौकशी केली तर ते आयडी बनावट असल्याचे व तो सरकारी कर्मचारी नसल्याचे आढळून आले.
त्यावरून दादर रेल्वे पोलिसांनी त्वरीत टीसी श्री अनिल महेंद्रकुमार मिश्रा नेमणूक दादर रेल्वे स्टेशन यांची फिर्याद गुरक्र. ७५०/२०२० कलम १७०,४२० ४६५,४७१ भादवि अण्वये दाखल करून जलद तपास करून त्यास सदरचे आयडी बनवून देनार इसम नामे.-अनिस अब्दुल राठोड वय- ३४ वर्षे रुम नं ६४,४/६ कुलसुम भाई भोला चाळ शिवडी क्रॉस रोडओझा मार्ग शिवडी मुंबई यास त्वरित अटक केली.
त्याने हे बनावट आयडी बनवण्यासाठी वापरलेले साहित्य लॅपटॉप व प्रिंटर हा वडाळा रेल्वे पोलिसांनी त्यांच्या कडील दाखल गुरक्र ६६४/२०२० क.४२० ,४६५ भादवि मध्ये जप्त केले आहे.
दादर रेल्वे पोलिसांनी केलेल्या प्रभावी कामगिरी व जलद तापासा मुळे बनावट आयडी बनवून देनारा व बनावट आयडी वापरनारा दोघे अटक झाल्याने बनावट आयडी वापरनाऱ्यावर वचक निर्माण झाला आहे. दादर रेल्वे पोलिसांकडून केलेल्या प्रभावी कारवाइचे दैनंदिन प्रवाशी कर्मचारी,मुख्य तिकीट तपासनीस स्टेशन डायरेक्टर यांनी दादर रेल्वे पोलिस स्टेशनला समक्ष भेट देवून कौतुक करुन आभार व्यक्त केले आहे.
रिपोर्टर