उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्या आश्वासनानंतर शहापुरच्या पत्रकारांचे उपोषण मागे

शहापुर (महेश धानके) : शहापुर तालुक्याच्या तहसीलदार यांची बदली होण्यासाठी स्वातंत्र्य दिनापासून सुरू असलेले पत्रकारांचे साखळी उपोषण भिवंडीचे प्रांत नलदकर यांच्या लेखी आश्वासनानंतर ६ व्या दिवशी मागे घेण्यात आले.
 
काल पत्रकारांच्या साखळी उपोषणाचा ६ वा दिवस होता,त्या आधीच पत्रकारांचे एक शिष्टमंडळ आमदार दौलत दरोडा यांच्या सोबत उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री पालकमंत्री यांच्या भेटी घेऊन आले होते,त्यामुळे या उपोषण बाबत प्रशासकीय स्तरावर हालचाल सुरू झाल्या त्यानुसार काल दुपार नंतर भिवंडीचे उपविभागीय अधिकारी मोहन नलदकर यांनी उपोषणकर्त्या पत्रकारांची व साखळी उपोषण समितीची भेट घेतली,व उपोषण सोडण्याची विनंती केली,यावेळी पत्रकारांनी तहसीलदार सूर्यवंशी यांचा हेकेखोर स्वभाव,त्यांच्या कामातील चुका यांचा पाढा वाचल्यानंतर यापुढे तहसीलदार यांच्या कार्यपद्धती मध्ये सुधारणा घडून येईल,तहसीलदार यांनीही चुका मान्य करून सहकार्य करण्यात येईल असे सांगितले मात्र पत्रकार त्यांच्या बदलीवर ठाम राहिल्याने व आमदार दौलत दरोडा यांनी पत्रकारांची बाजू लावून धरल्याने उपविभागीय अधिकारी नलदकर यांनी तहसीलदार शहापुर यांच्या बदलीची पत्रकारांची मागणी जिल्हाधिकारी ठाणे यांच्यामार्फत महसूल विभागाला पाठवण्याचे लेखी आश्वासन दिल्याने पत्रकारांनी आपले उपोषण स्थगित केले,

आमदार दौलत दरोडा,राष्ट्रवादी चे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे,यांच्या हस्ते उपोषणास बसलेल्या पत्रकारांना चहा देऊन उपोषण मागे घेण्यात आले
   
दरम्यान आम्ही उपोषण संपवले नसून स्थगित केले आहे,येत्या १५ दिवसात बदली न झाल्यास आमचा पुढचा लढा आम्ही अधिक तीव्र करू असे पत्रकार समितीने भिवंडी प्रांत याना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे.

संबंधित पोस्ट