प्रतीक्षा नगर रस्त्यांवर खड्डेच खड्डे! चार महिन्यातच खड्ड्याची चाळण!

मुंबई (जीवन तांबे) : सायन येथील प्रतीक्षा नगर ते प्रतीक्षा आगर प्रयत्न असलेल्या मार्गावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मार्गाची चाळण झालेली आहे.

या यामुळे सामान्य नागरिक पालिका प्रशासनावर संतप्त व्यक्त करीत आहे. प्रतीक्षा नगर ते प्रतीक्षा आगर पर्यंतचा मार्गावर कित्येक वर्षे म्हाडा इमारतीचे बांधकाम करीत असल्याने या मार्गावर सतत जड वाहतूक होत होती. यामुळे या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरलेले होते. या धुळी मुळे या परिसरातील नागरिकांना श्वसन, दमा आणि अनेक साथीचे आजाराचा सामना करावा लागत होता. टॅक्सी चालक ही येण्यास नकार देत असल्याने अनेकांना कित्येक रुग्णांना टॅक्सीची तासंतास वाट पहावी लागत होती.

काही दक्ष नागरिकांनी हा मार्ग लवकर बनवावा अशी पालिका तसेच प्रतिनिधी कडे पत्रव्यवहार मागणी केली.

शेवटी त्याच्या पत्रव्यवहार ला यश येऊन या मार्गा बनविण्याकरिता पालिकेने एकूण ३८ कोटीचे टेंडर  २०१७ रोजी पास केले. याचे काम विशाल ठेकेदार यांना दिले आहे.या ठेकेदार याने ड्रेनेज लाईन, फुटपाथ, मार्गाचे काम सुरू केले.

२०२० डिसेंबर रोजी प्रतीक्षा नगर ते आगर पर्यतचा दिड किलोमीटर मार्ग बनविण्याकरिता ठेकेदाराने नोव्हेम्बर व डिसेंम्बर रोजी सुरवात केली.

चार महिन्यातच या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गाचे निसकृष्ट दर्जाचे काम केल्याने या मार्गाची चाळण चाळण झाली आहे. या गरोदर, वयोवृध्द व सामान्य नागरिकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही टॅक्सी वाले यात प्रवासी घेऊन जाण्यास विरोध करतात.यापैकी काही रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. मात्र आता पडलेले मोठे खड्डे आणि त्याची अवस्था पाहून या कामाच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रतिक्रिया दत्ता केळुस्कर (भाजप वार्ड अध्यक्ष १७३)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मार्गाचे निस्कृठ काम करणाऱ्या ठेकदारावर देशद्रोहीचा गुन्हा टाकला जाईल असे घोषित केले होते. त्याधर्तीवर या ठेकेदाराला काळ्या यादीत न टाकता त्याच्यावर देश द्रोहीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे

संबंधित पोस्ट