चेंबूर, कुर्ला, चुनाभट्टी, टिळक नगर परीसरातील मार्गावर खड्डे! पालिकेचे दुर्लक्ष!
- by Reporter
- Aug 21, 2020
- 507 views
मुंबई (जीवन तांबे) : एम पश्चिम विभागातील पी.एल लोखंडे मार्ग, सिद्धार्थ कॉलनी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने या मार्गावर वाहन चालवणे चालकांना मुश्किल झाले आहे.
चेंबूर एम पश्चिम विभागातील पीएल लोखंडे मार्ग, सिद्धार्थ कॉलनी, वाशीनाका, झेंडा नगर, घाटला, टिळक नगर तसेच कुर्ला व चुनाभट्टी मार्गावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत.
पालिका ठेकेदार या खड्ड्यात खडी टाकून खड्डे भरून निघून जातात परंतु हे खड्डे काही तासात
पुन्हा ते उखटले जात असल्याने या मार्गावर वाहन चालविताना व सामान्य नागरिकांना चालताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
खड्ड्यातील साचलेले पाणी चालत असलेल्या नागरिकांच्या अंगार उडत कपडे डागलेले होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. खड्ड्याला लावलेली मलमपट्टी निघून गेल्याने लाखो रुपयाचा खर्च पाण्यात जाऊन नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी कर
खड्ड्यांमुळे नेमका रस्ता कुठे आहे, असा प्रश्न सामान्य नागरिक व चालकांना पडत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना तसेच वृद्ध, गर्भवतींना येथून चालणे धोक्याचे झाले आहे. पडलेले मोठे खड्डे आणि त्याची अवस्था पाहून या कामाच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रिपोर्टर