मुलुंड ते मुंब्रातील भारत गियर कंपनीपर्यंत लवकरच टीएमसीच्या बसेस धावणार

मुलुंड (शेखर भोसले) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ५ महिन्यांपासून बंद असलेल्या मुलुंडहून ठाण्याला जाणाऱ्या टीएमटीच्या बसेस लवकरच सुरु होणार असून ठाणे परिवहन समितीच्या मीटिंगमध्ये झालेल्या चर्चे अंतर्गत परिवहन खात्याने सुरुवातीला मुलुंड चेकनाका ते मुंब्रातील भारत गिअर्स कंपनीपर्यंत बसेस चालू करण्याला मान्यता दिली आहे.  

मुलुंडहून ठाण्याला आणि ठाण्याहून मुलुंडला जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे खूपच हाल झाले होते. त्यातच लोकल ट्रेन बंद असल्याने अनेकांचा कामानिमित्त प्रवास बंद झाला होता. ठाणे मनपा परिवहन समितीचे सदस्य शमीम खान यांनी यासंदर्भात समितीच्या मीटिंगमध्ये विषय मांडून मुंब्रातील भारत गिअर कंपनी ते मुलुंडपर्यंत बंद चालू करण्याची मागणी केली होती. त्याला अनुसरून मुलुंड चेकनाका ते भारत गिअर कंपनी, मार्ग क्र ७९ वर १६ बसच्या फेऱ्या आणि भारत गिअर कंपनी ते मुलुंड चेकनाका या मार्गावर २४ बसच्या फेऱ्या अश्या एकूण ४० बस फेऱयांना टीएमसीने परवानगी दिली असून लवकरच या फेऱ्या चालू होणार असल्यामुळे मुलुंडच्या प्रवाशांना मुंब्रातील भारत गियर पर्यंत ये-जा करणे सोयीस्कर होणार आहे.

संबंधित पोस्ट