बहुजन कल्याण आश्रमशाळा तपासणीमध्ये भ्रष्ट्राचार २ लाख रुपये द्या व हवा तो दर्जा मिळावा बहुजन कल्याणमंत्री बच्चू कडू यांच्या गृह जिल्ह्यातील प्रकार

अमरावती (प्रतिनिधी) : बहुजन कल्याण विभागामार्फत संचालित भटक्या व विमुक्त जातीच्या आश्रम शाळा तपासणीच्या मोहीमेत प्रचंड भ्रष्ट्राचार बोकाळला असून २ लाख रुपये प्रती शाळा असा रेट तपासणी अधिकाऱ्यांचा ठरलेला आहे अमरावती विभागातील १६३ शाळांनाचे मूल्यांकन प्रत्येकी २लाख रुपये घेऊन करण्यात आले आहे असा आरोप भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केला. बहुजन कल्याणमंत्री विजय वटेड्डीवार यांनी विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या शाळा ध्येय धोरणानुसार चालविल्या जात आहे की नाही याचे क्रॉस मूल्यांकन दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या मार्फत क्रॉस पद्धतीने करण्यात आले यामध्ये तपासणी अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीवर आधारित मूल्यांकन करणे अवश्य होते परंतु तपासणीच्या नावाखाली अधिकाऱ्यांना कुरण मिळाले यामध्ये अमरावती विभागातील शाळा औरंगाबाद येथील प्रादेशिक समाजकल्याण आयुक्त शेख व निरीक्षक अंधारे यांनी तपासल्या असून काही ढ शाळांना चक्क २ लाख रुपये घेऊन "अ "दर्जा देण्यात आला आहे तर काही उत्कृष्ट शाळांनी पैसे दिले नसल्यामुळे मूल्यांकन जाणीवपूर्वक पेंडिंग ठेवण्यात आले आहे.संस्था चालकांना निरोप देऊन पैसे आना व अ दर्जा घेऊन जा असे निरोप बहुजन कल्याण विभागातील अधिकारी व काही दलाल देत आहे याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. अमरावती विभागामध्ये १६३ शाळा औरंगाबाद येथील श्री शेख व अंधारे या अधिकाऱ्यांनी तपासल्या असून प्राथमिक व माध्यमिक शाळेमिळून प्रत्येकी २ लाख रुपयांचा दर या अधिकाऱ्यांनी ठेवला आहे.ज्या संस्था चालकांनी  आमदार खासदार व मंत्र्यांकडे तक्रार केली तर अश्या शाळांचे मूल्यांकन जाणून बुजून खराब केल्या जात आहे.बहुजन कल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या गृह जिल्ह्यात असे प्रकार होत असल्याने त्यांनी याबाबत  चौकशी करावी अशी मागणी निवेदिता चौधरी यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट