
प्रभाग क्र १०५ मध्ये गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव
- by Reporter
- Aug 21, 2020
- 980 views
मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पूर्वच्या नगरसेविका रजनी केणी यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र. १०५ मध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव वामनराव शाळेच्या बाजूला, स्वामी समर्थ उद्यानासमोरील मोकळ्या जागेत, मुलुंड (पूर्व)
येथे बनविण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात गणपती बाप्पा विसर्जनासाठी सुशोभित अश्या "कृत्रिम तलावाच्या" निर्मितीचे काम नगरसेविका रजनी केणी यांच्या नगरसेवक निधीमधून करण्यात आले.
नगरसेविका रजनी केणी यांनी यानिमित्ताने
नागरिकांना विनंती केली आहे की, दि २३ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत प्रभागातील घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती विसर्जन हे कुत्रिम तलावातच करण्यात यावे. कोरोना पार्श्वभूमीवर विसर्जनाच्या वेळी गर्दी टाळण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.
रिपोर्टर