
नगरसेविका समिता कांबळे यांच्यामार्फत गरजूंना मोफत धान्य वाटप
- by Reporter
- Aug 20, 2020
- 617 views
मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पश्चिमेच्या नगरसेविका समिता विनोद कांबळे यांच्या माध्यमातून गरजु नागरिकांना कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मोफत धान्यवाटप करण्यात आले. नगरसेविका समिता कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचा विभागातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद कांबळे, मंडल अध्यक्ष मनिष तिवारी, महामंत्री नंदकुमार वैती, प्रकाश मोटे, वाॅर्ड महिला अध्यक्ष सविता रजपूत, संदेश गाडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर