पालिकेच्या टी वॉर्डने मुलुंड परिसरात उभारली १६ गणेशमूर्ती संकलन केंद्रे
- by Reporter
- Aug 20, 2020
- 472 views
मुलुंड (शेखर भोसले) : गणेशोत्सव काळात गणेश विसर्जनाच्या वेळी तलाव परिसरात अतिरिक्त गर्दी होवू नये यासाठी पालिकेच्या टी विभागाने मुलुंड मधील पूर्व व पश्चिम परिसरात मिळून १६ गणेशमूर्ती संकलन केंद्रे उभारली आहेत. मुलुंड पश्चिमेला ११ तर मुलुंड पूर्वेला ५ गणेशमूर्ती संकलन केंद्रे पालिकेतर्फे निश्चित करण्यात आली असून भाविकांनी आपल्या गणेशमूर्ती विसर्जन तलावात नेवून तेथे गर्दी न करता या संकलन केंद्रात आपल्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी जमा कराव्यात असे आवाहन पालिकेच्या टी विभागातर्फे करण्यात आले आहे.
मुलुंड पूर्व येथील चिंतामणी देशमुख गार्डन, पाटील प्रसाद, खंडोबा मंदिर, नवघर पोलिस स्टेशन, मदनलाल धिंग्रा उद्यान अश्या ५ ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे उभारली आहेत तर मुलुंड पश्चिम येथे बी आर रोड वरील घ. क. व्य. चौकी, वीणा नगर, सिटी ऑफ जॉय, तांबे नगर, आर्य भट्ट उद्यान, नाहूर गाव महापालिका शाळा, विजय नगर गार्डन, टी विभाग प्रशासकीय इमारत, सचखंड दरबार, सर्वोदय नगर, साई बाबा मंदिर या ११ ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे उभारली आहेत.

रिपोर्टर