१५ दिवसांपूर्वी काढलेला नाल्यातील कचरा अद्याप न उचलल्याने परिसरात घाण व दुर्गंधी
- by Adarsh Maharashtra
- Aug 20, 2020
- 1563 views
मुलुंड :(शेखर भोसले) सुमारे १५ दिवसांपूर्वी पालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या कर्मचाऱयांनी नाला सफाईच्या वेळी नाल्यातून काढलेल्या कचर्याचा ढिगारा मुलुंड पूर्व येथील हनुमान चौकातील हनुमान मंदिरालगतच टाकून ठेवला असल्याने तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या मंदिराच्या बाजूलाच जेष्ठ नागरिक कट्टा असून तेथे सकाळ-संध्याकाळ जेष्ठ नागरिक विरंगुळ्यासाठी येऊन बसत असल्याने त्यांना या दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हनुमान मंदिर जरी बंद असले तरी श्रद्धाळू, भाविक या मंदिरासमोरून जाताना काही काळ थांबून श्री हनुमानाच्या लांबून पाया पडून पुढे जातात. परंतु श्री हनुमान मंदिराच्या समोरच नाल्यातील कचरा उपसून टाकला असल्याने येथे श्रद्धेने पाया पडणाऱ्या भाविकांना देखील या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
१५ दिवसांपासून कचऱ्याचा ढिगारा येथे पडला आहे, पालिकेला तक्रार करूनही तो उचलला जात नसल्यामुळे मच्छर व माश्या त्यावर बसत आहेत तसेच पाऊसाचे पाणी या कचऱ्यावर पडल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे असे येथील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ जाधव यांनी सांगितले असून लवकरात लवकर हा कचरा पालिकेने उचलून परिसर स्वच्छ करावा व करदात्या नागरिकांना होणारा त्रास थांबवावा अशी मागणी संतप्त स्वरात एकनाथ जाधव यांनी केली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम