कुर्ला मध्ये आपापसात झालेल्या वादात डोक्यात हातोडा घातल्याने एका तरुणाचा मृत्यू!
- by Reporter
- Aug 19, 2020
- 342 views
मुंबई (जीवन तांबे) : दोघा मित्रात झालेल्या वादात एकाने दुसऱ्याच्या डोक्यात हातोडा घातल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. आरोपीला कुर्ला पोलिसांनी काही तासात अटक केली आहे.
कुर्ला येथील परीघ वाडी बोहरी जबल रहाणाऱ्या सुब्बल जगल चौधरी उर्फ बंगालीयांच्या घरातून भांडणाचा आवाज आला असल्याने फिर्यादी अय्याज खान पाहायला गेला असता आरोपी सुब्बल उर्फ बंगाली याचे व त्याचा मित्र जावेद शेख यांचे जोरदार आपापसात भांडण सुरू होते.
फिर्यादी त्याला समजवायला गेला परंतु रागाच्या भरात सुब्बल उर्फ बंगाली याने किचनच्या ओट्या खाली असलेला हातोडा काढून मृत जावेद शेख यांच्या डोक्यात घातला.
फिर्यादी अय्याज खान याने जावेद यास वाचविण्याचा प्रयत्न केला .परंतु आरोपी सुब्बल उर्फ बंगाली याने पुन्हा २ ते ३ वेळा जावेद याच्या डोक्यात हातोडा घातला.
फिर्यादी अय्याज शेख याने मृत जावेद याला वाचविण्याचा पर्यंत करीत असताना आरोपी सुब्बल उर्फ बंगाली याने फिर्यादी अय्याज याच्या ही डोक्यात हातोडा घातला तो आपला जीव वाचविण्याकरिता पळ काढून आरोपीच्या सासूच्या घरी गेला त्यांने घडलेली घटना सासूला सांगितली.
आरोपी सुब्बल उर्फ बंगाली यांच्या घरी गेले असता त्याने यांना बघताच क्षणी पळ काढला. जखमी जावेद याला उपचारा करीता सायन रुग्णालयात घेऊन गेले असता डॉकटरानी त्याला मृत्यू घोषित केले.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून कुर्ला पोलिस ठाणे यांनी गु.र.क्र. ३६२/ २०२०, कलम ३०२,३०७ भा.द. वी गुन्हा नोंद केला आहे.
गुन्हे प्रकटीकरण पथकांचे स. पोलीस निरीक्षक, पो.उ. नि. व कर्मचारी यांनी आरोपीस गुप्त बतामीदारा मार्फत भांडूप परिसरातून अटक केली आहे.पुढील तपास कुर्ला पोलीस ठाणे करीत आहे.
रिपोर्टर