ई-पासची आवश्यकता नाही, आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊन लागल्यापासून राज्यातील एसटी सेवा खोळंबली आहे. परंतु आता सरकारने आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी दिली आहे. कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊन लागल्यापासून राज्यातील एसटी सेवा खोळंबली आहे. परंतु आता सरकारने आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी दिली आहे.

अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. परंतु त्याला प्रवाशांचा तितका प्रतिसाद मिळाला नाही. आता सरकारने जिल्हाबंदी उठवली आहे. महाराष्ट्रात राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला उद्यापासून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडॉनचे नियम टप्याटप्याने शिथील करण्यात येत आहेत. यात जिल्हाबंदी अजूनही कायम आहे. यापूर्वी लॉकडाऊन शिथिल करतेवेळी राज्यातील उद्योग, व्यापार, दुकाने सुरू केले गेले आहे. पण शहरी भागातून ग्रामीण भागात होणारा संसर्ग टाळावा, राज्यात जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर फक्त शेतीमाल, औद्योगिक तसेच इतर माल वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती. नागरिकांना मात्र अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय कारणाशिवाय एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नव्हती. एसटी सेवा ही जिल्हांतर्गत सुरू होती. पण आता एसटी दुसर्‍या जिल्ह्यातही जाणार आहे. यावेळी तुम्हाला ईपासची आवश्यकता नसेल. परंतू, खासगी वाहनांना ईपास मात्र काढावा लागणार आहे.

संबंधित पोस्ट