क्वॉरोटाईन करतील या भीतीने चेंबूर मधील नागरिकांचा अँटीजन चाचणी करण्यास विरोध!
- by Reporter
- Aug 19, 2020
- 296 views
मुंबई (जीवन तांबे) : चेंबूर परिसरात कोरोना रुग्णाची संख्या आटोक्यात येण्याकरिता महाराष्ट्र शासन व एम पश्चिम विभागाच्या वतीने चेंबूर मधील अनेक विभागात अँटीजन चाचणी शिबीर घेण्यात येत आहे.
मात्र पालिका अँटीजन चाचणीत जाणून बुजून पॉझिटिव्ह दाखवून आपल्याला क्वॉरोटाईन करतील या भीतीने विभागातील नागरिक अँटीजन चाचणी व अँटिबॉडी चाचणी करून घेण्यास पालिका कामगारांना विरोध करीत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव देशात व मुंबईत वाढल्याने हा प्रसार रोखण्याकरिता राज्य सरकारने एक लाख लोकांच्या अँटीजन चाचणी व अँटिबॉडी चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता.
महाराष्ट्र शासन व पालिका एम पश्चिम आरोग्य विभागाच्या वतीने चेंबूर एम पश्चिम विभागात ऍन्टीजेंन चाचणी शिबीर झोपडपट्टीतील विभागात जाऊन घेत आहे. पालिका कर्मचारी नागरिकांना अँटीजन चाचणी करून घेण्याकरिता या असे आव्हान करीत आहेत.
परंतु चाचणीला अल्प प्रतिसाद मिळत आहे. उलट आम्ही चाचणी करून घेतल्यास जाणून बुजून पालिका आमची चाचणी पॉझिटिव्ह दाखवून क्वॉरोटाईन करतील असे त्यांचे म्हणणे असून, तुम्हीच अँटीजन चाचणी करून घ्या आणि १४ दिवस क्वॉरोटाईन व्हा असे प्रति उत्तर देत आहेत.त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना अँटीजन चाचणी करिता नागरिकांची वाट पाहावी लागत आहे.
संपूर्ण चेंबूर एम पश्चिम विभागात कोरोना बाधित रुग्णानी एकूण ३५०० चा आकडा पार केला आहे. त्यात २५९० पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एकूण २९७ पेक्षा अधिक कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
फक्त पी.एल लोखंडे मार्गावर कोरोना बाधित रुग्ण ३१४ पेक्षा अधिक आहे. त्यातील २४९ रुग्णांना बरे झाल्याने घरी पाठविले तर 38 मृतांची संख्या होती. अशा हॉट स्पॉट असलेल्या विभागात एम पश्चिम विभागातील प्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिपत्या खालील आरोग्य कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेऊन चेंबूर परिसरातील कोरोनाची संख्या कमी केली असताना देखील आज घेण्यात आलेल्या अँटीजन चाचणी करिता फक्त ६० तर घाटला परिसरात दोन शिबिरात फक्त १२ तर त्याच विभागातील शिबिरात १४ जणांनी अँटीजन चाचणी करून घेतली आहे.
ठक्कर बाप्पा कॉलनी, सुभाष नगर, माहुल, वाशीनाका तसेच इतर विभागात नागरिक अल्पप्रतिसाद देताना दिसत आहे. पालिका आरोग्य सेविका, कर्मचारी व कार्यकर्ते झोपडपट्टीतील चाळी चाळीत जाऊन नागरिकांना आव्हान करीत असताना देखील आमची तब्बेत बरी आहे. आम्हाला काहीही झालेले नाही. आता अँटीजन चाचणी आमची करून आम्हाला पॉझिटिव्ह दाखवून क्वॉरो टाईन करायचे ठरवला की काय?असा सवाल ते करीत आहे.
मागील चार महिन्यात अनेक क्वॉरोटाईन केंद्रात कोरोना रुग्णांना निकृष्ट जेवण, गरम पाणी, केंद्रात अस्वछता तसेच कोणतीच सुविधा मिळत नव्हती त्यामुळे कित्येकांचे हाल झाले आहे तर सर्दी खोकला येत असल्याने ही नागरिकांना कोरोना दाखवून क्वॉरोटाईन केले जात होते त्यात खाजगी रुग्णालय अव्वाच्या सव्वा बिल वसूल करीत आसल्याची भीती नागरिकां मध्ये आजही कायम आहे त्यात गणपती सण आल्याने भर गणपतीत आमची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर आम्हाला क्वॉरो टाईन राहावे लागेल या भीतीने नागरिक अँटीजन चाचणी करण्यास विरोध दर्शविला .
चंद्रकांत हंडोरे ( काँग्रेसचे माजी समाजकल्याण मंत्री )
नागरिकांनी कोणतीही भीती मनात बाळगू नये. न घाबरता ही अँटीजन चाचणी करून घ्यावी. सामान्य नागरिकांना ही चाचणी करून घेण्यास परवडत नाही. मी स्वतः चाचणी करून घेतली आहे.
अनिल पाटणकर (सेना नगरसेवक व बेस्ट अध्यक्ष)
गणपती सण असल्याचे कारण देत आमची प्रतिकार शक्ती चांगली आहे .कारण नसताना पॉझिटिव्ह दाखवून क्वॉरोटाईन करतील या भीतीने नागरिक बाहे पडत नाही.
माझ्या विभागात दिन शिबीर घेतले त्यात फक्त १२ व १४ लोकांनी अँटीजन चाचणी करून घेतली. लोक चाचणी करण्यास भीत आहे.
रिपोर्टर