ब्लाइंड कार्ड्स एन्टरटेन्मेंट प्रस्तुत...अंतरंग आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव - २०२०...!

मुंबई (प्रतिनिधी) : ब्लाइंड कार्ड्स एन्टरटेन्मेंट प्रस्तुत अंतरंग इंटरनॅशनल पोईट्री फेस्टिवल- २०२० ही अंतरराष्ट्रीय ऑनलाईन कविता स्पर्धा दि.९ सप्टेंबर २०२० रोजी सुरु झाली आहे.
सर्वोत्कृष्ट निवडक काव्य कलाकृतींना रोख रक्कम पारितोषिक आणि सर्वच सहभागी कवींना काव्य प्रतिष्ठा प्रेरणा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्वौत्तम,सर्वोत्कृष्ट निवडक दहा कविता ब्लाइंड कार्ड्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत

अंतरंग मॅगझीन २०२० (डिजिटल) मध्ये प्रकाशित करण्यात येतील.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाचं किंवा विषयाचं बंधन नाही. इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषेतील कविता स्विकारल्या जात आहे.ब्लाइंड कार्ड्स एंटरटेन्मेंटच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर जगभरातून येणाऱ्या सर्व कविता प्रकाशित केल्या जात आहेत. 

प्रतिभावंतांना आपले काव्य सादर करण्यासाठी निर्माण केलेल्या या प्लॅटफॉर्मला भारतातून नव्हे तर जगभरातून भरभरून प्रतिसाद लाभत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन

संपूर्ण भारतातील विविध राज्यातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पाताळीवरून म्हणजे फिलिपिन्स, नायजेरिया, आफ्रिका, पाकिस्तान, अशा अनेक देशातून स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

पोईट्री फेस्टिवलच्या माध्यमातून लेखकांना आणि कवीजणांना त्यांच्या कलाकृतीसाठी जागतिक स्थराचा मंच उपलब्ध व्हावा. त्यांच्यातील कला,कौशल्य आणि काव्यप्रतिभा जगासमोर यावी तसेच  त्यांचे विचार, त्यांचा समाजाप्रतिचा दृष्टीकोण, प्रेम, निसर्गभाव, मानवी संबंध, मानवता अशा अनेक विविधस्पर्शी विषयांवर विचार व्यक्त करता यावा. जागतिक पातळीवर आपली एक स्व-बाजू मांडण्याची संधी काव्यरूपात उपलब्ध व्हावी" या उद्देशाने या पोईट्री फेस्टिवलची निर्मिती करण्यात आल्याचे प्रतिपादन या फेस्टिवलचे आयोजक सुराज कुटे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी सुराज कुटे यांच्याशी या ७०२१२६४५७८
नंबर वर संपर्क साधावा

संबंधित पोस्ट