
नाहूर व्हिलेज रोडवर प्रचंड खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण. संतप्त नागरिकांनी केली रस्ता दुरुस्तीची मागणी
- by Reporter
- Aug 19, 2020
- 1000 views
मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पश्चिम येथील विभाग क्र १०४ मधील नाहूर व्हिलेज रोडवर प्रचंड खड्डे पडले असून येथून नागरिकांना, वाहनचालकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. वाहनचालकांना खड्डे चुकविताना अपघाताचा सामना करावा लागत असल्याने तसेच नागरिकांना रस्त्यावरून चालताना खड्ड्यात साचलेले पाणी कपड्यांवर उडत असल्याने हा रस्ता लवकारातलवकर दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी आणि वाहनचालकांनी केली आहे.
विभाग क्र १०४ च्या अखत्यारीत येत असलेल्या नाहूर व्हिलेज रोडची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या संपूर्ण मार्गावर खड्डे झाले आहेत. पालिका अधिकारी आणि नगरसेवक प्रकाश गंगाधरे या रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करत असून रस्ता दुरुस्तीसाठी काहीच करत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले असून गणेशोत्सवापूर्वी रस्ता दुरुस्त होणे गरजेचे होणे गरजेचे होते परंतु बेजबाबदार पालिका अधिकारी आणि निष्क्रिय नगरसेवकांमुळे येथील नागरिकांना व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले असून लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त कारण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भातील अधिक माहीतीसाठी पालिका कार्यालयात भेट दिली असता कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. दरम्यान पाऊसामुळे मुलुंडमधील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून पालिकेने हे रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे अन्यथा त्रासलेल्या नागरिकांच्या असंतोषाचा सामना करावा लागू शकतो.
रिपोर्टर