
पालिकेच्या टी वॉर्डतर्फे मोफत कोरोना चाचणी केंद्रे सुरु
- by Reporter
- Aug 19, 2020
- 796 views
मुलुंड (शेखर भोसले) : पालिकेच्या टी विभागातर्फे मुलुंडमधील सर्व नागरिकांसाठी मोफत कोरोना चाचणी (RTPCR) केंद्रे दिनांक १६ ऑगस्ट पासून सुरु करण्यात आली आहेत.
मुलुंड पश्चिम येथील पी.के.रोड महानगरपालिका शाळा आणि मुलुंड पूर्व येथील मिठागर महानगरपालिका शाळा येथे ही कोरोना मोफत चाचणी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रात तपासणीसाठीची वेळ सकाळी १० ते दुपारी १-३० अशी ठेवण्यात आली आहे.
पालिकेने या केंद्रात तपासणीसाठी निश्चित केलेल्या निकर्षांनुसार येथे फक्त मुलुंड मधील रहिवाश्यांचीच मोफत तपासणी होणार असून तपासणीसाठी येताना नागरिकांना आधार कार्ड सोबत घेऊन यावे लागणार आहे.
डायबेटीस, ब्लड प्रेशर, इत्यादी आजार असणाऱ्या, सर्दी, खोकला, ताप, इत्यादी लक्षणे असणाऱ्या, कन्टेनमेंट झोनमधील, सील इमारतीतील व्यक्ति तसेच कोरोनाग्रस्त रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या सर्व
वयोगटातील व्यक्ती आणि वय वर्ष ५० वरील सर्व वयोगटातील व्यक्तींनी या मोफत कोरोना तपासणी केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन पालिकेच्या टी वॉर्डने मुलुंडमधील नागरिकांना केले आहे.
रिपोर्टर