मुलुंड पूर्व येथे प्लास्टिक कचरा संकलन अभियान संपन्न
- by Reporter
- Aug 19, 2020
- 802 views
मुलुंड (शेखर भोसले) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत आरोग्य संपन्न होउ दे' या आवाहनानुसार आपला परिसर प्लास्टिक मुक्त व्हावा यासाठी अस्मिता गोखले यांच्या अथक फॉउंडेशनच्या वतीने मुलुंड पूर्व येथे रविवार दि १६ ऑगस्ट रोजी नागरिकांकडून प्लास्टिकचा कचरा जमविण्याचा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाला पाठींबा देत मुलुंड पूर्वच्या नागरिकांनी प्लास्टिकचा भस्मासुर नष्ट करण्यासाठी संपूर्णपणे सहकार्य करत आपल्या घरातील प्लास्टिकचा कचरा आणून अथक फॉउंडेशनकडे जमा केला. हा जमा झालेला प्लास्टिकचा कचरा एका ट्रकमध्ये भरून पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला.
गेल्या कित्येक वर्षांपासून अथक फौंडेशन, सदैव शून्य कचरा व्यवस्थापन मध्ये मुलुंड पूर्व परिसरात काम करीत आहे. आपल्या ३९ व्या प्लास्टिक कचरा संकलन अभियाना अंतर्गत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नागरिकांनी कोरोनाला न घाबरता आपल्या घरातील, परिसरातील प्लास्टिकचा कचरा अथक फॉउंडेशनकडे आणून संकलित दिले.
अथकच्या आजपर्यंतच्या प्रवासात स्वयंसेवक म्हणून कार्यरत असलेल्या रवी काळे, आशुतोष गुर्जर, दिनेश बलगी, पाटील, शशिकला, संध्या पवार, वीणा याना यावेळी अध्यक्षा अस्मिता गोखले यांनी अथकचे टी शर्ट देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली केली. यावेळी भाजपाचे महामंत्री, माजी नगरसेवक नंदकुमार वैती उपस्थित होते.

रिपोर्टर