दीड महिना कोरोनाशी झुंज देत शिवसेनेचे उपविभागप्रमुख दिनेश जाधव घरी परतल्याने परिसरात जल्लोष

मुलुंड (शेखर भोसले) : तब्बल दिड महिना कोरोनाशी लढा देऊन दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून घरी आलेल्या शिवसेनेचे उपविभागप्रमुख दिनेश जाधव यांचे मुलुंड शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्ठी करण्यात आली तसेच त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून सरकारने लॉकडाऊन घोषित केल्याने गोरगरीब जनता, कामगार, यांच्यासाठी जीवाचे रान करत मुलुंडचे उपविभागप्रमुख दिनेश जाधव यांनी मेहनत घेतली. गोरगरिबांना धान्यवाटप, अन्नवाटप, मास्क, सॅनिटायजरचे मोफत वाटप, परिसरात सॅनिटायजर फवारणी करणे, होमिओपॅथी औषधांचे वाटप करणे ही व अशी अनेक सामाजिक कार्ये उपविभागप्रमुखा दिनेश जाधव यांनी गेल्या ४ महिन्याच्या काळात मुलुंडमधील जनतेसाठी केली. तसेच या कोरोना महामारीत विभागप्रमुख, आमदार रमेश कोरगावकर व महिला विभाग संघटिका संध्या वढावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलुंड विभागात ३६ मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून जनतेला कोरोनाच्या महामारीतून वाचवण्याचे महत्वपूर्ण कार्य केले.

अश्या प्रकारे रात्रंदिवस विभागातील जनतेची सेवा करत असताना दीड महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. कोरोनाची लक्षणें दिसताच व रिपोर्ट पॉसिटीव्ह येताच विभागप्रमुख रमेश कोरगावकर यांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली ताबडतोब सेवन हिल रुग्णालयात त्यांना दाखल करून घेण्यात आले. रुग्णालयातून देखील ते फोनद्वारे आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून विभागातील जनतेसाठी सेवा करत होते. गेले दीड महिना कोरोनाची झुंजत कोरोनावर मात करून दोनच दिवसापूर्वी दिनेश जाधव व्यवस्थित बरे होऊन सुखरूप घरी परत आले. दरम्यानच्या काळात
आमदार रमेश कोरगावकर हे या दीड महिन्याच्या काळात सेवन हिल रुग्णालयाच्या डॉक्टरांशी सतत संपर्क ठेवून त्यांच्या तब्येतीची चौकशी करत होते. 

दिनेश जाधव हे बरे होऊन रुग्णालयातून घरी परत आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱयांनी व विभागातील जनतेने आनंद साजरा केला.

संबंधित पोस्ट