
नागपूरात दोन मुलांसह पती-पत्नीची आत्महत्या
- by Adarsh Maharashtra
- Aug 18, 2020
- 1288 views
नागपूर, १८ ऑगस्ट : नागपूरात दोन मुलांसह पती-पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती धीरज राणे,पत्नी सुषमा राणे 11 वर्षीय मुलगा ध्रुव आणि 5 वर्षाची मुलगी वण्या अशी मयतांची नावे आहे. पत्नीने गळफास घेतला आहे.
पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली तर पती आणि दोन मुलांचा मृतदेह पलंगावर होता. राणे कुटुंब त्यांच्या आईसह कोराडी नजीक ओम नगर येथे राहते.धीरज राणे आणि त्यांची पत्नी आज सकाळी उशिरा पर्यंत उठले नाही म्हणून त्यांच्या आत्या, आईने आवाज दिले. त्यावेळी धीरज यांची पत्नी सुषमा त्यांच्याशी बोलल्या असल्याची माहिती समोर येतेय. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास सुषमा यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्यांच्याकडे एक सुसाईड नोट आढळली आहे. सुषमा राणे डॉक्टर होत्या तर धीरज नामांकित कॉलेजमध्ये लेक्चरर होते.
धीरज राणे वानाडोंगरी (ता. हिंगणा) येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विभाग प्रमुख तर डॉ. सुषमा या धंतोली, नागपूर येथील अवंती हॉस्पिटलमध्ये नोकरी करायच्या. घरी धीरज यांची आत्या प्रमिला (६५) असून, तिने सकाळी बराच वेळ होऊनही भाचा, सून नातवां पैकी कुणीच बाहेर दिसत नसल्याने धीरज यांच्या खोलीचे दार ठोठावले. आवाजही दिले.मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे धीरजच्या आईने शेजारच्या किराणा दुकानदारास तसेच ओमनगरात राहणारे सुषमा यांचे बंधू रितेश सिंग यांना माहिती दिली. नंतर पोलिसांना कळविले.पोलीस घटनास्थळी पोहोचले असून चौकशीला सुरुवात झाली आहे. या घटनेने राणे कुटुंबीय आणि त्यांच्या शेजाऱ्यां नाही धक्का बसला आहे. आमहत्येपूर्वी त्यांनी काही चिठ्ठी लिहून ठेवली का याचाही पोलीस शोध घेत आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम