
संतोष फाऊंडेशनची वंदेमातरम् डिजिटल संगीत मैफल संपन्न
- by Reporter
- Aug 18, 2020
- 1404 views
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व थिएटर बंद असल्याने डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे.निर्माता दिग्दर्शक हरेश शिवलकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्राला प्रेरणा देणाऱ्या देशभक्तीपर गीतांची वंदे मातरम् ही सुरेल संगीत मैफल डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन सादर करण्यात आली. संतोष फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि एच् ए एस एन्टरटेन्मेंटचे सुप्रसिद्ध निर्माते हरेश शिवलकर यांच्या आॅनलाईन कार्यक्रमात दीपाली
ग्रीन,आकाश शिवलकर, शिरीष कांबळे, आणि गिरीष डोईफोडे या गायक गायिकांनी मधुर देशभक्तीपर गीते सादर केली.तसेच मोनी देठे,डेनियल ग्रीन,विकी आडाव या वादकांनी संगीत साथ केली. या सुरेल संगीत मैफिलीचे सुत्रसंचलन , निवेदन अमित काकडे यांनी केले. साऊंड इंजिनिअर जैनू शेख आणि व्हिडिओ एडिटर राकेश परमार यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.या यशस्वी आॅनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला . तसेच या कार्यक्रमाचा असंख्य रसिकांनी हरेश शिवलकर या फेसबुक पेज वरून आणि एच् ए एस एन्टरटेन्मेंटच्या यू ट्यूब चॅनल वरून या कार्यक्रमाचा अनेकदा आनंद घेतला . या अविस्मरणीय कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर हरेश शिवलकर यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन विविध संकल्पना घेऊन हिंदी मराठी सुरेल गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करून रसिकांना घरबसल्या आनंददायी सुरेल संगीताचा नजराणा देण्यासाठी एच ए एस एन्टरटेन्मेंट प्रयत्नशील राहील असे मनोगत व्यक्त केले
रिपोर्टर