नदीत बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचविणाऱ्या पोलीस हवालदार अभिमान मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सत्कार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील बोरीवली येथील कस्तुरबा पोलीस स्टेशनमधील धाडसी , कर्तबगार , पोलीस कर्मचारी हवालदार अभिमान मोरे यांनी भरपावसात तुडुंब पाण्याने वाहणाऱ्या नदीत बुडणाऱ्या एका महिलेचे प्राण वाचविले.तसेच दहिसर अग्निशमन दलाच्या रवी पावडे आणि मारूती गायकवाड यांच्या मदतीने त्या महिलेस रूग्णालयात दाखल केले. धाडसी पोलीस हवालदार अभिमान मोरे यांनी प्रसंगावधान राखून महिलेला जीवनदान दिले , या कौतुकास्पद कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिमान मोरे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष संजय इरकल  , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  महिला उपाध्यक्ष उत्तर मुंबई जिल्हा निरीक्षक स्मिता बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.संजय इरकल यांनी सर्व उपस्थित  मान्यवरांचे आभार मानले .

संबंधित पोस्ट