
बदलीची मागणी मान्य न झाल्यास उपोषण आणखी चिघळणार पत्रकार उपोषण दिवस चौथा
- by Reporter
- Aug 18, 2020
- 1035 views
शहापूर (महेश धानके) : शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्या विरोधात शहापूर तालुक्यातील पत्रकारांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे .उपोषणाच्या चौथ्या दिवशी सुद्धा विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक पक्षांचा वाढता पाठिंबा बघता तहसीलदारांच्या विरोधातील जनतेचा रोष लोकांसमोर येत आहे .उपोषणाच्या वाढत्या पाठिंब्यासोबत लोकांच्या विविध तक्रारी समोर आल्याने तहसीलदारांच्या मनमानी आणि गैरकारभाराची प्रकरणे उघडं होण्यास सुरुवात झाली आहे .
बेमुदत साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी पत्रकार उमेश भेरे, प्रियेश जगे, हूसेनभाई शेख, प्रकाश फर्डे रवींद्र खाडे,हे पत्रकार साथरोग नियंत्रण कायद्याचे सर्व नियम पाळून उपोषणाला बसले होते .सोशल डिस्टन्सिन्गचे सर्व नियम पाळून दररोज चार पत्रकार उपोषणाला बसून शहापूर तहसीलदारांच्या बदलीची मागणी कायम ठेवली आहे .विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच तहसीलदारांच्या मुजोर कारभारामुळे त्रस्त असलेली सामान्य जनताही पत्रकारांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहे .
शासनाने पत्रकारांची मागणी गांभीऱ्याने घेतली नाही किंवा जणभावणेचा आदर करून शहापूर तालुक्यातील गचाळ प्रशासन सुधारले नाही तर शासनाचा निषेध करून तहसीलदारांची बदली व्हावी म्हणून आमरण उपोषणाची तयारी ही पत्रकारांनी सुरू केली आहे . गेल्या अनेक दिवसापासून जनतेच्या अनेक तक्रारी आणि शहापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दौलत दरोडा, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल कांबळे तसेच पत्रकारांच्या तक्रारीची शासनदरबारी दखल घेतली जात नसेल तर लोकशाहीला काळिमा फासणाऱ्यां शहापूर तहसीलदार यांच्याकडून शहापूर तालुक्यात असाच मुजोर कारभार सुरू राहण्यास खतपाणी मिळेल .त्यामुळे शासनाने पत्रकारांची मागणी मान्य न केल्यास सर्व पत्रकार आमरण उपोषणाला बसणार असल्याने हे आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत .
रिपोर्टर