मोबाईल चोरांना धाडसाने पकडणाऱ्या पो. ना. चिमाजी यादव यांचा वरिष्ठांनी केला गौरव

मुलुंड (शेखर भोसले) : १७ ऑगस्ट रोजी भांडुपच्या टँक रोड, ड्रिम माॅल समोर बेस्ट बस मध्ये चार मोबाईल चोर, चोरी करून पळून जात असताना तेथे कर्तव्यावर असणारे मुलुंड वाहतूक विभागातील पो.ना. चिमाजी चंद्रकांत यादव यांना दिसताच त्यांनी ताबडतोब चोरांचा पाठलाग करून एकाला पकडण्यात यश मिळविले. कमांडर चिमाजी यादव यांनी सदर इसमाला भांडूप पोलिस ठाणे यांचेकडे ताब्यात दिले असून त्याच्यावरती गु.र. क्र. ४४५/२० भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर तीन चोरांचा पोलिस तपास करीत आहेत.

मुलुंड वाहतूक विभागाचे पो. ना. चिमाजी यादव यांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वाहतूक शाखेच्या विक्रोळी विभागाचे सहा. पोलिस आयुक्त अस्मिता भोसले आणि मुलुंड वाहतूक विभागाचे व.पो.नि.विजय भिसे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

पो.ना. चिमाजी यादव यांनी केलेल्या या धाडसी कामगिरीबद्दल भांडुप परिसरातील जनतेकडून त्यांच्या
कार्याचे कौतुक होत आहे.

संबंधित पोस्ट