मुंबईला मागे टाकत पुणे शहर ठरलं देशातील नवं ‘कोरोना हॉटस्पॉट’कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत महाराष्ट्राने दक्षिण अफ्रिकेलाही टाकलं मागे
- by Adarsh Maharashtra
- Aug 17, 2020
- 1075 views
मुंबई : महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतीक राजधानी असलेलं पुणे शहर रविवारी भारतातील कोरोनाच्या संसर्गाची राजधानी बनलं. देशात सर्वाधिक रुग्णांची पुणे शहरात नोंद होत असल्याने हे शहर मुंबईला मागे टाकत देशातील नवं ‘करोना हॉटस्पॉट’ बनलं आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत महाराष्ट्राने दक्षिण अफ्रिकेलाही मागे टाकले असून या देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५,९५,८६५ इतकी आहे.जागतीक आकडेवारीनुसार, दक्षिण अफ्रिकेचा पाचवा क्रमांक लागतो. याबाबत अमेरिका (५५,६६,६३२), ब्राझिल (३३,४०,१९७), भारत (२६,४७,३१६) आणि रशिया (९,२२,८५३) हे देश दक्षिण अफ्रिकेच्या पुढे आहेत. दरम्यान, मुंबई शहर हे अद्यापही कोरोनाबाधितांच्या मृत्यू प्रमाणात आघाडीवर आहे. टाइम्सनाऊ न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे.आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी माहिती देताना सांगितलं की, “महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांत COVID-१९ चे ३०० पेक्षा कमी मृतांची संख्या झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्यांची संख्या २०,०३७ एवढी झाली आहे. त्यानुसार, आत्तापर्यंत राज्यात ५,९५,८६५ इतके बाधित लोक आहेत. महाराष्ट्राचं बरं होण्याचं प्रमाण हे ६९.८२ टक्के आहे. तर मृत्यूप्रमाण हे ३.३६ इतके आहे.त्याचबरोबर आत्तापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलेल्यांची संख्या ४,१७,१२४ इतकी आहे. ही संख्या अॅक्टिव्ह केसेस १,५८,३९५ पेक्षा जास्त आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम