
रेल बचाव आदिवासी बचाव समितीचा जनजागृतीसाठी दौरा
- by Reporter
- Aug 17, 2020
- 687 views
अमरावती (प्रतिनिधी) : रेल बचाव -आदिवासी बचाव नागरी कृती समितीने मेळघाट मधील डाबका व धुळघाट रेल्वे येथील गावास भेट देऊन सरपंच व गावकरी यांचेसमक्ष चर्चा करण्यात आली. अकोला-अकोट-धुळघाट-डाबका-खंडवा या रेल्वे मार्ग मेळघाट मधूनच जावा यासाठी सविस्तरपणे चर्चा केली.भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी रेल बचाव आदिवासी बचाव नागरी कृती समितीचे गठन केले असून समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्रभूदास भिलावेकर यांची नियुक्ती सर्वसंमतीने केली आहे. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या आदिवासी विरोधी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. भाजपा अमरावती ग्रामीण च्या वतीने गठन केलेल्या "रेल बचाव मेळघाट बचाव" या कृती समितीच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचा आवाज बुलंद केल्या जात आहे.समितीचे सदस्य गावागावात जाऊन अकोट धुळघाट खंडवा या रेल्वे मार्गाची उपयुक्तता पटवून देत आहे. आज झालेल्या दौऱ्यात कृती समितीचे अध्यक्ष व माजी आमदार श्री. प्रभूदास भिलावेकर, कृती समितीचे उपाध्यक्ष व भाजपा नेते श्री रमेश मावस्कर, तालुकाध्यक्ष श्री. हिरालाल मावस्कर, श्री. सुभाष गुप्ता, श्री सुधाकर पकडे, श्री. सुशील गुप्ता,श्री.धोंडिबा मुंडे, श्री. माणिकराव मुंडे, श्री. विजय जावरे ,श्री. मनीष पांडे, श्री. रामभाऊ भिलावेकर, श्री. मोहन घुमारे इत्यादी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी बांधव उपस्थित होते.
रेल बचाव आदिवासी बचाव समिती
रेल बचाव मेळघाट बचाव कृती समितीमध्ये अध्यक्ष - श्री प्रभूदास भिलावेकर,उपाध्यक्ष - श्री रमेश मावस्कर,सचिव श्री श्याम गंगराळे, सदस्य श्री हिरालाल मावस्कर,श्री सदाशिव खडके,सौ बिंदीयाताई, भीमराव जावरकर,सौ जयाताई दिलीप वसू,श्री राजू धुर्वे,श्री रामलाल बाटु भिलावेकर,श्री राम भिलावेकर,श्री प्रकाश मावस्कर,श्री धोंडिबा मुंडे,
श्री माणिकराव मुंडे,श्री शीवाजी फळ,श्री प्रल्हाद लटपटे,श्री सुधाकर पकडे, यांचा समावेश करण्यात आला आहे.
रिपोर्टर