दिलखुलास' कार्यक्रमात आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांची मुलाखत
- by Reporter
- Aug 17, 2020
- 420 views
मुंबई (प्रतिनिधी) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'आदिवासींच्या विकासासाठी' या विषयावर आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि. १८ ऑगस्ट आणि बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.तसेच तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या ॲप वर ही याच वेळेत ऐकता येईल. सहायक संचालक मोहिनी राणे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत आदिवासी विकास दिन कार्यक्रम व उपक्रम,आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजना,कोरोनाच्या काळात आदिवासी समाजासाठी केलेल्या विशेष उपपयोजना, कोरोनासंदर्भात जनजागृतीसाठी राबवण्यात आलेले उपक्रम तसंच दुर्गम भागातील आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय सुविधा आदी विषयांची सविस्तर माहिती ॲड. पाडवी यांनी दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

रिपोर्टर