
बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाचा गौरव
- by Reporter
- Aug 17, 2020
- 512 views
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीला १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल क्राईम डायरी तर्फे संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गेल्या ५ वर्षात ३ कोटी वरून २००० कोटी पेक्षा जास्त भांडवल केलेल्या सर्व संचालक ह्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचाल करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. विशेषतः बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या आदर्श सहकार तत्वावर संचालक मंडळ चालवीत आहे. या पतसंस्थेचे संचालक मंडळातील १२ सभासद
१) अध्यक्ष श्री.परम वीर सिंह
मुंबई पोलीस आयुक्त )
२) उपाध्यक्ष श्री.प्रभाकर देवकर
३) सचिव श्री.दादासाहेब आनंद
सरगर
४) संचालक श्री.विजय धोत्रे
५) खजिनदार सौ.शीला यादव
खैरे
६) संचालक श्री.मनोज सुरेश
कोष्टी
७) संचालक श्री.धनवंत चव्हाण
८) संचालक श्री.हेमंत चौधरी
९) संचालक श्री.राजेश चंद्रकांत
इंदुलकर
१०) संचालक श्री.महेश अनपट
११) संचालक श्री.प्रफुल सुर्वे
१२) संचालक श्री.हरीश अंधळे
ह्यांना पतसंस्थेच्या शत्वर्शपूर्ती निमित्त क्राईम डायरी तर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी सर्व संचालकांना मनःपूर्वक अभिनंदनपर शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच कोरोना योध्दा सन्मान पत्र देऊन सर्व संचालकाचा क्राईम डायरी तर्फे गौरव करण्यात आला . पतसंस्थेचे कालावधी (१९२० ते २०२०) आणि मागील ५ वर्षातील टर्न ओव्हर रूपये २०००/- कोटीच्या वर आहे ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे .या प्रसंगी पतसंस्थेच्या वतीने प्रत्येक पोलिस कर्मचारी रस्त्यावर उतरून जनतेचे रक्षण करीत आहेत म्हणून मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनला १ लाख बॉटल्स सॅनिटायइजर व मास्कचे वाटप करण्यात आले.तसेच पतसंस्थेने मुंबईतील ५८ पोलिस अधिकारी कोराना महामारी मध्ये मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना सर्व कर्जाचे हफ्ते माफ करून दिलासा दिला, तसेच कोणत्याही मदतीची गरज लागली तर पतसंस्थेच्या वतीने कुटुंबियांना या पुढेही मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले. क्राईम डायरी तर्फे पतसंस्था १०० वर्ष पूर्ण करीत असल्यामुळे एक सुबक सुंदर अभिनंदनपर फ्रेम देऊन पतसंस्थेच्यास सर्व संचालकांचे कौतुक करण्यात आले.तसेच ह्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक, संस्था संचालक तसेच महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (एमएचबी) पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक श्री.विजय धोत्रे ह्यांनी केलेल्या विशेष सहकार्यामुळे पतसंस्थेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.तसेच पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी ह्यांनी सर्व क्राईम डायरीच्या टीमचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केल्या बद्दल श्री.संजय इरकल यांनी सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार मानले.यावेळी चारकोप पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.श्रीकांत दरेकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हा अध्यक्ष श्री.किरण मोरे युवक जिल्हा उपाध्यक्ष आणि क्राईम डायरी ( मुंबई प्रदेश) मुख्य कार्यकारी संपादक श्री. संजय इरकल,तसेच प्रतिनिधी प्रवीण पाटील,क्राईम डायरीप्रतिनिधी , राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महिला उपाध्यक्षा सौ. स्मिता बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रिपोर्टर