डोळखांब मध्ये कातकरी युवकाचा संशयास्पद मृत्यु ? पोलिसांकडुन आकस्मिक मृत्यूची नोंद.

शहापूर (महेश धानके) : शहापुर तालुक्यांतील डोळखांब बाजारपेठेपासुन अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत तलवाडे मधील मौजे हिंगळुद गावातील पंधरा वर्षिय कातकरी कातकरी तरूणाचा मृतदेह चोर नदी परिसरात सडलेल्या अवस्थेत मिळाला होता.पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी,हा घातपात असल्याचा संशय पिडित युवकाच्या कुटुंबाने ,तसेच आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष मा.श्री.रविंद्र (दादा)मराडे व श्रमजीवी संघटना शहापुर तालुका सचिव श्री.प्रकाश खोडका व श्रमजीवी कार्यकर्त्यांनी केला आहे.

किन्हवली पोलिस स्टेशन अंतर्गत येनाऱ्या डोळखांब पोलिस दुरक्षेत्र हद्दीतील  हिंगळुद गावातील सखाराम नामदेव वाघ हा पंधरा वर्ष वयोगटातील युवक हिंगळुद येथील एका गावकऱ्याकडे जनावरे (म्हैशी) राखन्याचे काम करत होता.हा युवक लग्नाचे कारण सांगुन २६जुलै रोजी निघुन गेला,मात्र या युवकाचा मृतदेह चोर नदी. या ठिकाणी भेटला .त्यानंतर पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली,परंतु हा आकस्मिक मृत्यु नसुन घातपात असल्याचा , आरोप सखाराम नामदेव वाघ याच्या कुटुंबाने आणि आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष मा.श्री रविंद्र (दादा) मराडे व श्रमजीवी संघटनेचे शहापुर तालुका सचिव

मा.श्री.प्रकाश (भाऊ) खोडका व श्रमजीवींच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.व मृतदेहाचे शवविच्छेदन (pm) का केले गेले नाही ,असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे.संबंधित तरूणाच्या मृत्युप्रकरणी चौकशी सुरू आहे.अनेकांचे जबाब नोंदवले आहेत,परंतु सबळ धागेदोरे हाती येताच गुन्हेगारांना तात्काळ ताब्यात घेउ ,असे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डि.एम.परदेशी यांनी म्हटले आहे.तसेच हे प्रकरण संशयास्पद असुन पोलिसांनी योग्य तो तपास करून आरोपिंना ताब्यात घ्यावे ,अशी मागणी आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष मा.श्री.रविंद्र (दादा) मराडे व श्रमजीवी संघटना शहापुर तालुका सचिव मा.श्री.प्रकाश (भाऊ) खोडका व श्रमजीवी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष डोळखांब पोलिस ठाण्यात जाउन केली आहे.

संबंधित पोस्ट