संजय राउत यांच्या वक्तव्यावरुन भाजपचा निषेध

डोंबिवली (श्रीराम कांदू) : शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी  डॉक्टरविषयी केलेल्या वक्तव्यावर भाजप कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करुन निषेध व्यक्त करण्यात आला. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी या विषयात आपले मत मांडावे  असे आवाहन उपस्थित भाजप पदाधिकारी यांनी  या पत्रकार परिषदेत  केले. या पत्रकार परिषदेस भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष

शशिकांत कांबळे, जेष्ठ नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती राहुल दामले, भाजप पूर्व मंडल अध्यक्ष नंदु जोशी, जिल्हा चिटणीस प्रज्ञेश प्रभुघाटे, युवा मोर्चा कल्याण जिल्हा अध्यक्ष मिहिर देसाई,
युवा मोर्चा पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, साउथ सेल अध्यक्ष मोहन नायर उपस्थित होते.
 
जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले कि,   मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही,  कंपाउडरकडून घेतो. त्याला जास्त कळतं, असे व्यक्तव्य संजय राउत यांनी व्रुतवाहिनीशी बोलताना केले. अशा प्रकारचे अपमानजनक वक्तव्य करुन महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्व डॉक्टरांचा अपमान केला आहे. करोना सारख्या संकटकाळी

डॉक्टरांचे मनोबल वाढवण्याऐवजी खच्चीकरण करण्याचे काम संजय राउत यांनी केले आहे.त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात नाराजी पसरली आहे.
 
जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांचे आम्हाला यानिमित्ताने फोन आले व त्यांनी नाराजी व्यक्त केली.कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे उच्च शिक्षित असून स्वतः डॉक्टर आहेत.ज्या डॉ. श्रीकांत शिंदे यांना लोकसभा मतदारसंघातून भाजप सेना महायुतीचे

उमेदवार म्हणून ५ लाख ५९ हजार ७२३ मतदान मिळाले होते.या मतदारांंमध्ये शेकडो वैद्यकीय क्षेत्रात
काम करणाऱ्या नागरिकांचा आणि विशेषतः डॉक्टरांचा समावेश आहे.भाजपच्या वतीने संजय राउत यांचा जाहीर निषेध करित आहोत. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या विषयात आपलं मत मांडावे असे  भाजपच्या

वतीने शशिकांत कांबळे यांनी आवाहन खा.डॉ. शिंदे यांना केले.

संबंधित पोस्ट