कल्याण डोंबिवली महापालिकेच्या द्वारावर कारोना महामारी विरोधात आंदोलन .

डोंबिवली (श्रीराम कांदू) : नागरी हक्क संघर्ष समिती तर्फे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रात कारोना महामारी विरोधात तीव्र आंदोलन भर पावसात महापालिका गेट वर करण्यात आले.

महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या मनमानी कारभारामुळे आणि हलगर्जीपणा मुळे आज या आपत्तीत ५०० लोकांचा बळी गेलेला आहे. आम्ही गेले चार पाच महिने अनेक उपाय योजना करोना मुक्ती साठी सुचवल्या होत्या त्याची दखल आयुक्त महोदय यांनी घेतली नाही. याचा फटका नागरिकांना बसला पोलिसांना बसला. अनेकांनी आपले प्राण गमवावे लागले.

शेवटी नागरी हक्क संघर्ष समितीला व सर्वपक्षीय कार्यकर्ते यांना आज आंदोलन करावे लागले. कार्यकर्ते यांनी बॅनर घोषणा बोर्ड घेऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून महापालिकेवर धडक दिली.

धोरणात्मक निर्णय असल्याने मी यावर काही करू शकत नाही. म्हणून बुधवारी दुपारी एक वाजता आयुक्त दालनात आयुक्त यांच्या बरोबर बैठक निश्चित करण्यात आली.

आमच्या खालील विषेश मागण्या आहेत.सर्वांना मोफत कारोना उपचार मिळाला पाहिजे. खाजगी व सरकारी हॉस्पिटल मध्ये पूर्ण मोफत उपचार द्या.लोक आत्महत्या करीत आहेत. म्हणून मनोसोचार तज्ञ डॉक्टर कायम स्वरुपी नेमा.तीस हजार लोकांन मागे एक स्मशान भूमी द्या.डिझेल/गॅस वरील विद्युत दहिनी तात्काळ सुरु करा. पर्यावरण वाचवा. रोज कोणत्या हॉस्पिटलला बेड किती उपलब्ध आहेत ते जाहीर करा.आणखी काही मागण्या आणि सूचना आहेत. त्यावर बुधवारी दुपारी एक वाजता आयुक्त यांचे बरोबर बैठक आहे.

मोर्चात सहभागी झालेले कार्यकर्ते बाबा रामटेके, डॉ गिरीश लटके, अण्णासाहेब रोकडे, इरफान शेख, काळू कोमासकर, राजा अक्केवार, नोवेल साळवे, श्रीकांत कांबळे, सैयद इजाज,अमित केरकर, व इतर कार्यकर्ते यांनी भर पावसात मोर्चा आंदोलन केले. महापालिका गेट वर मोर्चा अडवण्यात आला. तेथे कार्यकर्त्यांनी यांनी भाषणे करून, घोषणा देऊन हल्ला बोल केला.

संबंधित पोस्ट