
कांदिवली मध्ये श्रीसिध्दीविनायक सहकारी ग्रहनिर्माण संस्थेच्या कार्यालयासमोर झेंडा वंदन संपन्न.
- by Reporter
- Aug 15, 2020
- 1358 views
मुंबई (प्रतिनिधी) : श्रीसिध्दीविनायक सहकारी ग्रहनिर्माण संस्थेच्या एस.आर.ए.कार्यालयासमोर संस्थेचे विद्यमान महसचिव भारत कवितके यांचे हस्ते १५ आँगस्ट स्वातंत्रदिनानिमित्त झेंडा वंदन चा कार्यक्रम पार पडला.या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तोंडाला मास्क लावले होते व सोशल डिस्टन्स पाळण्यात आले होते.याप्रसंगी विभागातील उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना संस्थेचे विद्यमान महासचिव भारत कवितके यांनी सागितले की,' भारतभर धुमाकूळ घालून सर्वांना भयभीत करून सोडणार्या कोरोनाचे लवकरच या देशातून ,या जगातून पलायन होईल व सारे कोरोनाच्या चिंतेतून मुक्त होतील.अशी आपण सर्वांनी आशा बाळगू. 'याप्रसंगी संस्थेचे खजिनदार हिंदूराव मोरे,सचिव डी.आर.पाठक,करीमुल्ला सिध्दीकी,अजहर सिध्दीकी गोपाळ घाग,मुकेश गुप्ता,पिंटू वर्मा,व इतर नागरिक उपस्थित होते.
रिपोर्टर