संपर्कात आलेल्या लोकांनी कोविड-१९ ची टेस्ट करुन घ्यावी. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा कोविड-19 चा रिपोर्ट पॉझिटीव्ह

मुंबई (प्रतिनिधी) : सहकार व  पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची काल कोविड -१९ ची चाचणी करण्यात आली. त्यांचे  रिपोर्ट काल रात्री पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत.

दरम्यान, बाळासाहेब पाटील याची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत. काळजी करण्याची गरज नाही अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज (बाबा)  पाटील यांनी दिली.

संपर्कात आलेल्या लोकांनी कोविड-१९ ची  टेस्ट करुन घ्यावी, शिवाय किमान आठवडाभर विलगिकरणात रहावं असे आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट