मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ-कलानिधी समितीच्या वतीने दहिहंडींच्या निमित्त स्वच्छता मोहीम- वृक्षारोपण उपक्रम

मुंबई (प्रतिनिधी) : मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ आणि कलानिधी यांच्या संयुक्त विद्यमाने विशेषतः २५ थरांची हंडी अर्थात २५ ठिकाणी वृक्षारोपण आणि मुंबईतील चार समुद्र किनारी चौपाटी स्वच्छता करण्यासाठी एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. सकाळी ८ वाजता माहिम कोळीवाडा येथील रेतीबंदर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.तसेच आणखी ३ समुद्र चौपाटीवर साफसफाई केली.त्यावेळी,प्लास्टिकच्या पिशव्या , बाटल्या, कचरा गोळा करून कचऱ्याच्या गाड्या भरून सर्वत्र साफसफाई करण्यात आली . त्यानंतर दुपारी विक्रोळी पुर्वेकडील, कन्नमवार नगर उड्डाणपुला शेजारी द्रुतगती महामार्गावर झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आले.सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मराठी व्यावसायिक निर्माता संघ आणि कलानिधी समिती यांच्या वतीने हा एक उल्लेखनीय सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी १५५ वाद्यवृंद कलाकारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन ३५ ठिकाणी १२०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ मुंबई या संस्थेचे अध्यक्ष उदय साटम , कलानिधी समिती या संस्थेचे अध्यक्ष अशोक वायंगणकर , उपाध्यक्ष बाळा पांचाळ , गोविंद हडकर , राजू कांबळे, सुचित ठाकुर , शंकर पिसाळ , गणेश सचिन विश्वास चव्हाण , कविता घडशी , आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. झाडे लावा झाडे जगवा या सामाजिक उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण केल्यावर शेवटी कलानिधी समिती या संस्थेचे अध्यक्ष अशोक वायंगणकर यांनी या सामाजिक उपक्रमास बहुमोल मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे नगरसेवक श्री.अरविंदजी भोसले , वृक्षतज्ञ श्री.विक्रम यंदे या मान्यवरांचे व सर्व उपस्थितांचे आभार मानले .

संबंधित पोस्ट