
फलटण तहसिलदार कार्यालयास ' धनगर शासन महाराष्ट्र राज्य' व्दारा मागण्याचे रक्ताने लिहीलेले निवेदन सादर.
- by Reporter
- Aug 14, 2020
- 828 views
मुंबई (भारत कवितके) : लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २२५ व्या पुण्यतिथीनिमित्त सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तहसिलदार कार्यालयास 'धनगर शासन महाराष्ट्र राज्य 'व्दारा संस्थापक व प्रदेशाध्यक्ष शंभुराजे शेंडगे पाटील यांनी धनगर समाजाच्या मागण्या करीता आपल्या रक्ताने लिहीलेले निवेदन सादर केले.
धनगर समाजाचा एस.टी.प्रवर्गात समावेश करा,धनगर समाजातील मेंढपाळाना संरक्षण द्यावे,व धनगर समाज मेंढपाळांना स्वरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी.य़ा प्रमुख मागण्याचे निवेदन फलटण तहसिलदार कार्यालयात देण्यात आले.मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र भर आंदोलन करण्यात येईल.असा इशारा देण्यात आला.
रिपोर्टर