कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबईतून धावणार विशेष रेल्वे गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : गणपती उत्सवासाठी दरवर्षी लाखो चाकरमाणी मुंबईतून कोकणात जात असतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे कोकणात जाणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण रेल्वे बंद आहेत, तर एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी विविध अटी ठेवण्यात आल्या आहेत. अशा चाकरमाण्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी आली आहे.

गणपती विशेष ट्रेनचा तपशील पुढील प्रमाणे:

सीएसएमटी - सावंतवाडी-सीएसएमटी -८० फेऱ्या

एलटीटी- कुडाळ एलटीडी - १६ फेऱ्या

एलटीटी- रत्नागिरी -एलटीटी- ४० फेऱ्या

एलटीटी सावंतवाडी एलटीटी - २६ फेऱ्या

दरम्यान, याआधी राज्य सरकारनेही कोकणात जाणाऱ्यांना दिलासा दिला होता. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून मिळणार सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

यासंदर्भात मंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे.

संबंधित पोस्ट