
वीज चोरीचे आव्हान रोखण्या एैवजी, भरमसाठ वीज देयके पाठविण्याचे प्रताप!
- by Reporter
- Aug 14, 2020
- 525 views
मुंबई (ओंमकार शिरवडकर) : सद्या कोरोनाचे संकट असताना सर्व व्यवहार ठप्प झाले असताना ग्राहकांना भरमसाठ वीज देयके पाठवून विद्युत पुरवठा करणाऱ्यांनी एकप्रकारे शॉक दिला आहे. एकिकडे भ्रष्ट मार्गामुळे मुंबईसह राज्यातील वीज चोरी रोखण्यात,बंद पडलेले विद्युत प्रकल्प सुरु करण्यास प्रशासनास अपयश आले असताना दुसरीकडे मनमानी तऱ्हेने वीज देयके पाठविणे ही खेदजनक बाब आहे असे मत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडून सन्मानित दीपक शिरवडकर आणि यांनी व्यक्त केले
तसे पहाता दोन दशकांपासून विजेची समस्या भेडसावत आहे. राज्यातील अंदाजे २२५४ मेगावँटचे वीज प्रकल्प बंद पडले आहेत. जे एसडब्यू ६००,सीईएसी लि.६००,गुप्ता एनर्जी ११०,वर्धा पॉवर वरोरा २२०, आयडियल एनर्जी ५००, लाईट मेटल २४ आदी प्रकल्प बंद आहेत.
राज्यातील वीज चोरी रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेस भ्रष्ट नीतीमुळे अपयश आले आहे. हजारो कोटींची थकबाकी आहे. वीज गळतीची समस्या आहे; वीज वापराबाबत सार्वजनिक दिसणारी बेजबाबदार प्रवृत्ती ह्या गंभीर बाबी आहेत असे मत ही दीपक शिरवडकर व श्री ढेकळे यांनी व्यक्त केले.
वीज क्षेत्रातील खासगीकरणा नंतरही विजेचे उत्पादन वितरण,किंमत ठरविणे या सर्व ठिकाणी मक्तेदारी असल्याचे जाणवते. वीज दरवाढ ही ग्राहकांच्या माथी नेहमीच मारली जाते. बेस्टचे मुख्यालय असो किंवा महावितरणचे मुख्यालय असो अगदी मुख्यालयांच्या परिसरात वीज चोरी होताना दिसते.यामध्ये प्रशासनातील काही भ्रष्टाचारी व दलाल यांची असलेली अर्थपूर्ण हातमिळवणी लपून राहिलेली नाही असा संताप दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केला.
रिपोर्टर