भरमसाठ बिल पाठवल्याच्या निषेर्धात शिवसेनेचा अदानी इलेट्रिक सिटीवर मोर्चा!सोशल डिस्टनचा फज्जा!

मुंबई ( जीवन तांबे ): उपनगरातील ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटीने लॉक डॉउन काळात   वीज रिडींग न घेताच भरमसाठ वाढीव बिल पाठवल्याच्या निषेर्धात शिवसेनेच्या वतीने आज टिळक नगर येथील अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयावर आज धडक निषेध मोर्चा काढण्यात आला.

अदानी इलेक्ट्रिसिटी वतीने मुंबई उपनगर जिल्ह्यात गोरगरीब झोपडपट्टीत व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विभागात वीज पुरवठा केला जातो. कोरोना ह्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या टाळेबंदी व संचारबंदीमुळे गेले चार महिन्यांपासून नोकरी, व्यवसाय यासारखे छोटे-मोठे उद्योगधंदे संपूर्ण बंद झाले आहेत. 

अशा परिस्थितीत अदानी इलेक्ट्रिसिटी ह्या वीज पुरवठा कंपनीने वीज रिडींग व घेता नागरिकांना सरासरी भरमसाठ वाढीव लाईट बिल पाठवली आहेत.

गेले चार महिन्यांपासून उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाकीची झाली आहे. त्यात अदानी वाढीव वीज बिल ग्राहकांच्या माथी मारले आहे. 

त्यामुळे नागरिकांच्या न्याय व हक्कांसाठी चांदवली शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली आज चेंबूर येथील टिळकनगर अदानी इलेट्रीकसिटी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

यावेळी अदानी कार्यालयातील अधिकारी यांना निवेदन देऊन वीज बिल कमी करण्याची मागणी करीत जर वीज बिल कमी केले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा लांडे यांनी दिला.  यावेळी अदानी मुख्य दरवाजासमोर वाढीव बिलाची होळी करण्यात आली.

यावेळी चांदिवली मतदार संघातील पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चात सहभागी झालेल्या काही शिवसैनिकांनी तोंडाला मास्क लावला नव्हता तसेच सर्वांनी  सोशल डिस्टनचा पूर्ण फज्जा उडवून सरकारचे नियम धाब्यावर मारलेले दिसत होते.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट