बापरे बाप ! दुचाकीत शिरला कोब्रा साप सोसायटीत घाबरट
- by Adarsh Maharashtra
- Aug 13, 2020
- 395 views
डोंबिवली :(श्रीराम कांदू)
गेल्या आठदिवसापासून पावसाने जोर धरल्याने नदी, नाल्यालगत शेतजमीन, जगंलातील बिळात राहणाऱ्या विषारी बिन विषारी सापांच्या बिळात पावसाचे पाणी शिरल्याने पुन्हा एकदा या सापांनी मानवी वस्तीत शिरकाव केला आहे. असाच एक कोब्रा विषारी साप एका सोसायटीच्या पार्किगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीत शिरल्याने सोसायटीच्या रहिवाशामंध्ये एकच घबराट पसरली होती कल्याण डोंबिवलीत एकीकडे कोरोनाचे संकट कायम असतानाच विषारी सापांचा वावरही वाढल्याचे सर्प मित्रानी मानवी वस्तीतुन पकड्लेल्या शेकडोविषारी बिन विषारी सापांना निर्सगाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिल्याचे समोर आले आहे. गुरुवारी पुन्हा कल्याण पश्चिम परिसरात गांधारी नदी लगत असलेल्या रितू रिव्हर साईट या हायप्रोफाईल सोसायटीच्या 5 नंबरच्या इमारतीत पार्किंगमध्ये उभ्या . असलेल्या एका दुचाकीत विषारी कोब्रा साप शिरल्याचा दुचाकीचा मालक तुषार म्हस्के यांना दिसला. त्यांनी तत्काळ सोसायटीच्या रहिवाशांना यांची माहिती देऊन वॉर संस्थेचे सर्पमित्र ज्ञानेश्वर सुतार यांना संपर्क करून दुचाकीत कोब्रा नाग शिरल्याची माहिती दिली. याच दरम्यान सोसायटीतील रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. तोपर्यत सर्पमित्र ज्ञानेश्वर सुतार हे घटनास्थळी दाखल होऊन या कोब्रा नागाला शिताफने दुचाकीच्या बाहेर काढून पकडले. कोब्रा नाग पडकल्याचे पाहून रहिवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा कोब्रा नाग साडेतीन फुटाचा असून उद्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन या विषारी कोब्रा सापाला निर्सगाच्या सान्निध्यात सोडणार असल्याचे सर्पमित्र ज्ञानेश्वर सुतार यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम