अवयवदान करण्यासाठी पुढे येण्याचे राज्यपालांचे युवकांना आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : जागतिक अवयव दान दिनानिमित्त आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन पुणे येथे एक छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला. अवयव दानामुळे इतरांना जीवनदान मिळते असे नमूद करून राज्यपालांनी युवकांना अवयवदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. राज्यपालांनी अवयवदानाचा संकल्प सोडणाऱ्या वैष्णवी पटोले या विद्यार्थिनीचे कौतुक केले. विद्यापीठातील २५७७ विद्यार्थ्यांनी अवयव दान करण्यास लेखी संमती दिली असल्याचे कुलगुरू डॉ. नितिन करमळकर यांनी संगितले. कार्यक्रमाचे आयोजन रासेयो व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेने केले होते.

संबंधित पोस्ट