पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावर खड्ड्यांचे साम्राज

मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पश्चिम येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावर गेल्या काही दिवसांत झालेल्या पाऊसामुळे असंख्य खड्डे पडले असून येथून वाहनचालकांना
विशेषतः रिक्षातील प्रवासी तसेच रुग्णवाहिकेमधील रुग्णांना येथून मार्गक्रमण करताना त्रास होत आहे.

काही दिवसांपूर्वी येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज थेटर यांनी पालिकेला येथील खड्डे बुजविण्यासाठी व रस्ता दुरुस्त करण्यासंबंधीची तक्रार दिली होती परंतु पालिकेच्या बेफिकीर अधिकाऱयांनी या तक्रारींकडे दुर्लक्ष केले असून अद्याप या रस्त्याची अवस्था बघायला वेळ काढला नसल्याचे मनोज थेटर यांनी सांगितले असून येणार्या गणपतीपूर्वी जर येथील रस्ते दुरुस्त नाही करण्यात आले तर गणपतीला घरी नेताना भाविकांना अडचणींचा सामना करावा लागणार असून स्थानिक नगरसेवक व पालिका अधिकारी यांनी त्वरित येथील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

पालिका अधिकाऱयांनी लवकरच येथील रस्ता दुरुस्त केला जाईल असे सांगितले आहे. परंतु नगरसेवक,  खासदार याच रस्त्याने रोज ये-जा करतात त्यांना मुलुंड पश्चिमेतील पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावर पडलेले खड्डे दिसत नाहीत का? एवढे दिवस हा रस्ता का दुरुस्त करण्यात आला नाही,  असे प्रश्न यानिमित्ताने येथील सामान्य नागरिक व फेसबुक सारख्या सोशल मीडियावर जागरूक कार्यकर्ते विचारताना दिसत आहेत.


संबंधित पोस्ट