जिया फाउंडेशनने जेष्ठ नागरिकांसोबत केला दहीहंडी उत्सव साजरा

मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पूर्व येथील संभाजी पार्कमध्ये 'जिया फाउंडेशन' या संस्थेच्या वतीने राजन गजरे यांच्या अध्यक्षतेखाली दहीहंडी उत्सवाचे आयोजन बुधवार दि १२ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. संध्याकाळच्या वेळेत संभाजी पार्कला फेरफटका मारण्यासाठी येणार्या अनेक महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमात भाग घेतला. प्रतीकात्मक हंडी यावेळी संभाजी पार्कमध्ये बांधण्यात आली होती व उपस्थित जेष्ठ नागरिकांनी देखील प्रतीकात्मक पद्धतीने ही दहीहंडी फोडली. यावेळी उपस्थित जेष्ठ नागरिकांना मास्क, आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळया तसेच स्टीम यंत्र मोफत वाटण्यात आले.
 
जिया फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष निलेश पवार व सुनील शितोळे, अरुणोदय नगरचे जेष्ठ नागरिक मोहिते, महाडेश्वर, वामन भोसले, सुरेश कांबळे, नितीन चव्हाण, घाग, कुलकर्णी व इतर अनेक जेष्ठ पुरुष व महिला नागरिक उपस्थित होते.


संबंधित पोस्ट