'वाढीव वीज बिल हा जनतेचा समज' हे विधान म्हणजे सत्तेचा माज आमदार अतुल भातखळकर यांची टीका

मुंबई (श्रीराम कांदू) : बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा वीज बिलांच्या सवलती बाबतचा कुठलाही निर्णय झाला नाही त्यामुळे ठाकरे सरकार हे 'बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात' अशाप्रकारचे असल्याची टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

ऊर्जा मंत्री श्री. नितीन राऊत हे म्हणतात, की वाढीव वीज बिल हा फक्त लोकांचा भ्रम आहे हे त्यांचे वक्तव्य म्हणजे सत्तेचा माज आला असल्याचे लक्षण आहे. अख्ख्या महाराष्ट्रात आणि मुंबईत वाढीव वीज बिलांमुळे लोक त्रस्त झालेली आहेत, नागपूरमध्ये एकाने वाढीव वीज बिलामुळे आत्महत्या केल्याची घटना घडलेली असताना सुद्धा राज्याचे ऊर्जामंत्री अशी बेमुर्वतखोर विधानं करतात हे अत्यंत संतापजनक आहे. ३०० युनिटपर्यंत वीज बिलं माफ करा अशी भाजपाची पहिल्या दिवसांपासूनची मागणी आहे, ती पूर्ण होईपर्यंत आंदोलन करत राहू असेही आ. भातखळकर यांनी म्हटले आहे.

संबंधित पोस्ट