विद्यार्थी भारतीने फोडली "यूजीसी विरोधात हंडी.
- by Adarsh Maharashtra
- Aug 13, 2020
- 1209 views
डोंबिवली:(श्रीराम कांदू)गेले अनेक महिने विद्यार्थी भारती वेगवेगळ्या पध्दतीने अंतिम सत्राच्या परीक्षा ऐच्छिक व्हाव्या म्हणून लढत आहे. मग ते केंद्र सरकारला रक्ताच्या ठस्याचे पत्र पाठवणे, इमेल पाठवणे, ट्विट करने, यूजीसीची प्रेतयात्रा काढली, उपोषण, बोंबा मारो आंदोलन, मोदींची पहाटे 04:00 ची आरती, भजन, कीर्तन इतकं सगळं करून देखील विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय मिळालेला नाही.
तसेच यावर्षी 12 जुलै युवा दिन व दहीहंडीच्या निमित्ताने विद्यार्थी भारती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचारी व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या यूजीसीची हंडी फोडून आमच्या शिक्षणावर आमचा अधिकार ची घोषणा दिली.तसेच युवा दिनाच्या निमित्ताने सर्व युवकांना ह्या लढ्याचे आव्हान करत ज्यांनी कोरोनाच्या काळात आपली भूमिका जबाबदारी ने पार पाडली त्या तरुणांचे कौतुक विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केले व उद्या सुप्रीम कोर्टातील सुनावनि नंतर पुढील वाटचालीची दिशा ठरेल व प्राण पणाला लावून लढू असे त्यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम