एमेसिबी कार्यालयावर भाजपाची धडक वीज बिले माफ नाही केली तर आंदोलनाची धमकी
- by Adarsh Maharashtra
- Aug 13, 2020
- 905 views
डोंबिवली:(श्रीराम कांदू) वाढीव वीजबिल, सतत वीज खंडित होणे यामुळे नागरिक त्रस्त आहेत त्यामुळे आम्हाला आंदोलन करायला भाग पडू नका. 500 रुपये बिल येत होते त्यांना आता 5 हजार बिल येत आहे ही सरकारी लूटमार आहे. दिल्ली पॅटर्न राबवणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी पत्र पाठवतात त्यांना उत्तर देत नाहीत ही शोकांतिका आहे. आम्हाला इतिवृत्त हवे आहे, एमइआरसी कडे आम्ही जाऊच नाही अशी भूमिका महावितरणची अयोग्य आहे. महावितरणने तातडीने नागरिकांना दिलासा द्यावा. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करा, तोडगा काढा. महावितरणने दादागिरी करू नये , बिल भरा असा तगादा लावणे चुकीचे आहे. अशी मागणी माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे
खंबालपाडा, कंचनगाव येथे दिवसातून 6 वेळा लाईट जाते. 7 किमी मध्ये इश्यू येत आहे. पण राज्यमंत्री असताना मेरी गो राउंड पद्धतीने आम्ही सर्व व्यवस्था केली, पण त्याची अमलबजावणी होत नाही. महावितरणचे अधिकारी दादागिरी करत असतील तर ते योग्य नाही, मला वीज खंडित होण्याचा अहवाल आम्हाला हवा. संबंधित अधिकारी तातडीने बदली करावा, वर्क फ्रॉम होम पूर्ण कोलमडले आहे, संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी.
नगरसेवक साई शेलार यांनी वीज खंडित होऊन नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्याबाबत चर्चा केली. तसेच कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी उपअभियंता अधिकारी नितीन दुपहारे यांची तातडीने बदली करण्याची मागणी केली. महावितरण अधिकारी दादागिरी करत असून युनियनबाजी सुरु आहे. यावेळी भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष नंदु जोशी, नगरसेवक बांधकाम व्यावसायिक मनोज राय आदी उपस्थित होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम